आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदान‎:शिवरखेडा येथे विहिरीत‎ पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान‎

दर्यापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर तालुक्यातील शिवरखेडा‎ गावात शरद सोळंके यांच्या शेतातील‎ ३० ते ४० फुट खोल विहिरीत‎ पडलेल्या कोल्ह्याला अमरावती‎ येथून गेलेल्या वनविभागाच्या रेस्क्यू‎ पथकाने सुमारे दीड तास प्रयत्न‎ करून मंगळवार ३ रोजी बाहेर‎ काढले. यामुळे या वन्य प्राण्याला‎ जीवदान मिळाले आहे. विहिरीत दोर‎ आणि लहान पिंजरा सोडून या‎ कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले.‎ त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवास‎ जंगलात सोडण्यात आले.

ही‎ कारवाई उपवनसंरक्षक चंद्रशेखर‎ बाला, सहायक वनसंरक्षक‎ अमरावती ज्योती पवार यांच्या‎ मार्गदर्शनात अमोल गावनेर यांच्या‎ नेतृत्त्वातील वनविभागाच्या रेस्क्यू‎ टीमने केली.हे रेस्क्यू पथक सातत्याने‎ वन्य प्राण्यांच्या रक्षणार्थ सज्ज असते.‎ या पथकाने गेल्या काही महिन्यांत‎ नीलगायी, साप, कोल्हे, हरिण अशा‎ विविध प्राण्यांची सुरक्षित सुटका‎ करून त्यांना जंगलात सोडले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...