आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरोघरी राबणार कुष्ठरुग्ण शाेध मोहीम ; सप्टेंबरदरम्यान आराेग्य विभागाचा उपक्रम

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनजागृतीसाठी जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत सक्रिय रुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ढोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, एकनाथ शिंदे, गजानन पन्हाळे, सांख्यिकी सहाय्यक सुभाष कुमावत आदी उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे प्रशिक्षीत कर्मचारी ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण करुन सक्रिय कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत. तसेच घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी करणार आहेत. नवीन कुष्ठरुग्णांना औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणार आहे. या रोगाच्या लक्षणांची तपासणी करणारी रुग्णालयातील यंत्रे सुस्थितीत असावी. संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीचे अहवाल रुग्णालयाला तातडीने कळवावे. तपासणीचे दैनंदिन अहवाल तयार करावे. प्रशिक्षीत तंत्रंज्ञाच्या माध्यमातुन नमुन्यांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी संबंधितांना दिल्या. या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन करुन मोहिम कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...