आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:‘हात से हात जोडो’ अभियानात घराेघरी‎ भेटी; महागाई, बेरोजगारीवर जनजागृती‎

अमरावती‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर काँग्रेसच्या वतीने शहरातील‎ रहाटगाव परिसरातून ‘हात से हात जोडो’‎ अभियानाला १४ मार्चला सकाळी ९‎ वाजता सुरुवात झाली. घराेघरी जाऊन‎ नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच‎ त्यांना पत्रकही देण्यात आले. या वेळी‎ मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी व‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते‎ राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या‎ कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो‎ यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर अ. भा.‎ काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस‎ कमिटीच्या आदेशानुसार अमरावती‎ शहरात व जिल्ह्यात ‘हात से हात जोडो’‎ अभियानाला माजी पालकमंत्री डॉ.‎ सुनील देशमुख, अमरावती शहर‎ (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू‎ शेखावत, माजी महापौर विलास इंगोले,‎ माजी महापौर मिलींद चिमोटे, प्रदेश‎ प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश‎ सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश‎ उपाध्यक्ष भैया पवार, प्रदेश चिटणीस‎ आसिफ तवक्कल, महिला काँग्रेस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अध्यक्षा डॉ. अंजली ठाकरे, युवक‎ काँग्रेस जिल्हा नीलेश गुहे, वैभव‎ देशमुख, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष‎ संकेत कुलट, एनएसयूआय शहराध्यक्ष‎ संकेत साहू, रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख‎ उपस्थितीत सुरुवात झाली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रहाटगाव परिसर येथे ‘हात से हात‎ जोडो’ अभियानाचे उत्तम आयोजन‎ माजी नगरसेवक गोपाल धर्माळे, माजी‎ नगरसेवक विजय वानखडे, काँग्रेस‎ सरचिटणीस मुकेश गिरी, दीपक लोखंडे,‎ किरण मेहरे, अरुण रामेकर यांनी केले.‎

सकाळी ९ वाजता मुख्य चौक रहाटगाव‎ येथून अभियानास सुरुवात झाली.‎ सर्वप्रथम बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा‎ फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून‎ अभिवादन करण्यात आले.‎ रहाटगाव परिसरात काँग्रेसच्या या‎ अभियानास प्रामुख्याने माजी नगरसेवक‎ बाळासाहेब भुयार, अशोक डोंगरे, संजय‎ वाघ, भैयासाहेब निचळ, प्रा. बी. टी.‎ अंभोरे, बाळासाहेब घोंगडे, सलीम बेग,‎ शोभा शिंदे, जयश्री वानखडे, देवयानी‎ कुर्वे, मैथिली पाटील, कांचन खोडके,‎ शिल्पा राऊत, शीतल देशमुख, अंजली‎ उघडे, दिलीप शेटे, सचिन निकम, प्रा.‎ अनिल देशमुख, दिनेश खोडके, देवेंद्र‎ पोहोकार, किशोर रायबोले, सचिन‎ निकम, नितीन काळे, विजय खंडारे,‎ अरुण बनारासे, डॉ. डी. एस. नवाळे,‎ मधुकर गवई, शाम देशमुख, वानखडे,‎ देवानंद गुडधे, दादाराव गुढधे, रवींद्र‎ शिरसाठ, सौरभ शेंडे, प्रतीक सावळे,‎ दिलीप चव्हाण, अशोक सुखदेवे, शंकर‎ अढळसे, प्रवीण राऊत, प्रा. अरुण राऊत‎ यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित‎ होते.‎

विविध घोषणांसह अभियान‎ नागरिकांपुढे भाजपच्या नाकर्तेपणाची‎ यादीच मांडण्यात आली. विस्तृत पत्रक‎ यावेळी परिसरातील सर्व नागरिकांना‎ प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. ‘भारतीय‎ राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद’, ‘नफरत‎ छोडो भारत जोडो’ या घोषणांनी संपूर्ण‎ रहाटगाव परिसर दुमदुमला होता.‎ काँग्रेसच्या या ‘हात से हात जोडो’‎ अभियानाला परिसरातील नागरिकांनी‎ चांगला प्रतिसाद दिला. महागाई व‎ बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांमुळे‎ नागरिकांमधी आक्रोश या निमित्ताने‎ प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या‎ एकंदरीत अाचरणाबद्दल समाजातील‎ प्रत्येक घटकात असलेली नाराजी‎ जाहीररीत्या नागरिकांनी या निमित्ताने‎ व्यक्त केली.‎

स्नेहभाव, सद्भावाचा संदेश‎ पदभ्रमण करत अभियानांतर्गत‎ परिसरातील नागरिकांसोबत‎ सत्ताधारी पक्षातर्फे देशात निर्माण‎ करण्यात येत असलेली महागाई,‎ बेरोजगारी,जातिवाद या बद्दल‎ नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात‎ आली. तसेच भारत जोडो यात्रेच्या‎ निमित्ताने काँग्रेसतर्फे देशात निर्माण‎ करण्यात येत असलेल्या स्नेहभाव‎ व सद्भवाचासंदेश देत प्रत्यक्ष‎ संवाद साधण्यात आला. राहुल‎ गांधी यांनी कन्याकुमारी ते‎ काश्मीरपर्यंत पूर्ण केलेल्या‎ अभूतपूर्व भारत जोडो यात्रे दरम्यान‎ प्रसारित केलेला संदेश प्रत्यक्ष‎ परिसरातील नागरिकांपर्यंत‎ पोहाेचवण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...