आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिला जातोय डोस; शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे लसीकरण

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा सुरू होण्यास अजून १८ दिवस शिल्लक असल्यामुळे वाट न बघताच ‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करणार केले जाणार आहे. कारण शहरात या वयोगटातील २२ हजार ५३१ लाभार्थी असून त्यापैकी १० हजार २०७ लाभार्थ्यांनी काॅर्बिव्हॅक्स लसीचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत ४५ टक्के विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी १४ च आहे.

ते बघता मनपा आरोग्य विभागाने टक्केवारी वाढवण्यासाठी कंबर कसली असून यापुढे घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. आतापर्यंत घराजवळ शिबिरांचे आयोजन करून लस दिली जात होती. १५ ते १८ वयोगटातील युवकांची लस घेण्याची टक्केवारी ५९ टक्के राहिली आहे. त्यामुळे या दोन्ही वयोगटातील विद्यार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. त्यांच्या पालकांनाही लसीचे दुष्परिणाम नसल्याचे सांगितले जाणार आहे. कारण सध्या चौथ्या लाटेचा धोका आहे. तत्पुर्वी जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल, तेवढे करायचे आहे.

शहरात घरोघरी जाऊन देणार लस
मनपाचा आरोग्य विभाग शहरातील घरांघरांमध्ये पात्र लाभार्थी शोधून त्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रेरित करणार आहोत. त्यांना लसीचे दुष्परिणाम नाहीत, असे सांगून लस देणार आहोत. -डॉ. विशाल काळे, आरोग्य अधिकारी, मनपा.

‘हर घर दस्तक : २’ अभियान १ जूनपासून सुरू
शहरातील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी १ जूनपासून हर घर दस्तक २ अभियान सुरू करण्यात आले कारण या वयोगटाची लस घेण्याची टक्केवारी फारच कमी आहे. ३० टक्के विद्यार्थ्यांनी चक्क लस घेण्यास नकार दिल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली.
शहरातील एका केंद्रावर लस घेताना विद्यार्थी.

बातम्या आणखी आहेत...