आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेवर ‘प्रगती’चा झेंडा ; निवडणुकीत सर्वच 17 ही जागा जिंकल्या

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कौल प्रगती पॅनलच्या बाजूने गेला आहे. या पॅनलची ओबीसी संवर्गाची एकमेव जागा आधीच अविरोध विजयी झाली होती. दरम्यान मतदानाच्या प्रक्रियेने उर्वरित सर्व १६ जागाही याच पॅनलने जिंकल्या आहेत.

विजयी संचालकांमध्ये ओबीसी संवर्गाचे अक्षय इंगोले (अविरोध), २५ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील मतदारसंघाचे नरेश पाटील (६५१७), राजेंद्र महल्ले (६८२९), प्रा. प्रशांत डवरे (६८०१), ओंकारराव बंड (६१२३), सुरेंद्र गावंडे (६३३५), अभय ढोबळे (६३४६), सुगंध बंड (६५२८) व बाळकृष्ण अढाऊ (६१२६)

शिव परिवारातील महत्त्वाची संस्था डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही शिव परिवारातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेतील बहुतेक कर्मचारी सदर बँकेचे सभासद आहेत. बँकेच्या मतदारांचा व्याप केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर यवतमाळ, अकोला व वर्धा जिल्ह्यातही विस्तारला आहे. या निवडणुकीत ३२ हजार ६४६ मतदारांपैकी केवळ ११ हजार ४३० (३५.०१ टक्के) मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...