आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण:डॉ. पंकज दिवाणच्या पोलिस कोठडीत 13 मेपर्यंत वाढ; अहवाल ठरणार महत्त्वाचा, राधानगरातील प्रियंका दिवाण खून प्रकरणाचे रहस्य अजूनही कायम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राधानगरस्थित डॉ. पंकज दिवाण यांच्या घरवजा रुग्णालयात २० एप्रिलला प्रियंका दिवाण यांचा मृतदेह आढळला हाेता. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात प्रियंका यांचा मृत्यू श्वास गुदमरून व डोक्यात अंतर्गत रक्तस्रावामुळे झाल्याचे पुढे आले. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी प्रियंकाचे पती डॉ. पंकज व सासू शोभा दिवाण यांना अटक केली आहे. दरम्यान दिवाण माता -पूत्राच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी (दि. ९) न्यायालयात हजर केले.

यावेळी डॉ. पंकज दिवाणच्या पोलिस कोठडीची मुदत १३ मेपर्यंत वाढवून देण्यात आली असून त्यांच्या आईची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. डॉ. पंकज व त्यांच्या आईला पोलिसांनी अटक केल्यानंतर सहा दिवसांचा कालावधी उलटला आहे, मात्र प्रियंका यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे रहस्य अजूनही उलगडल्या गेले नाही. घटनेच्या वेळी आपण घरी नसल्याचे डॉ. पंकज दिवाण पोलिसांना वारंवार सांगत आहे.

त्यामुळे खुन नेमका कसा झाला, हा प्रश्न पोलिसांसाठी अजूनही अनुत्तरीतच आहे. दुसरीकडे प्रियंका यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर एक अॅम्पूल व चार सिरींज सापडल्या होत्या. त्यामध्ये औषध होते. पोलिसांनी ते जप्त करुन न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहे. त्याचा अहवाल अद्याप आला नाही, या प्रकरणाच्या उलगड्यात तो अहवालसुध्दा महत्वाचा ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...