आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:डॉ. आंबेडकर विद्यालयात मातीकला कार्यशाळा

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध सणांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मातीपासून स्व कल्पनेने बैल, गणेशमूर्ती तयार करता याव्यात, या उद्देशाने फ्रेजरपुरा येथील दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात नुकतेच माती कला कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कलाशिक्षक श्रीकांत काळबांडे व कार्यशाळेचे मार्गदर्शक वैभव काळे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मातीपासून बैल, गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मातीच्या वस्तूंचे शाळेच्या प्रांगणात प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यशाळेला शाळेचे मुख्याध्यापक आशिष देशमुख, तुषार नाईक, भानुदास पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल उमाळे, तर आभार निखिल घोडेराव यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...