आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कौल प्रगती पॅनलच्या बाजूने गेला आहे. या पॅनलची ओबीसी संवर्गाची एकमेव जागा आधीच अविरोध विजयी झाली होती. दरम्यान मतदानाच्या प्रक्रियेने उर्वरित सर्व १६ जागाही याच पॅनलने जिंकल्या आहेत.
विजयी संचालकांमध्ये ओबीसी संवर्गाचे अक्षय इंगोले (अविरोध), २५ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील मतदारसंघाचे नरेश पाटील, राजेंद्र महल्ले, प्रा. प्रशांत डवरे, ओंकारराव बंड, सुरेंद्र गावंडे, अभय ढोबळे, सुगंध बंड व बाळकृष्ण अढाऊ, सर्वसाधारण २५ किमी बाहेरील मतदारसंघाचे राजेश उर्फ अमोल बारब्दे, अनिल भारसाकळे, भैय्यासाहेब मेटकर व दिलीप देशमुख अनुसुचित जाती प्रवर्गाचे यशपाल वरठे, व्हीजे-एनटी संवर्गाचे प्राचार्य जयवंत वडते आणि महिला प्रवर्गातील पुनम चौधरी आणि डॉ. अंजली ठाकरे यांचा समावेश आहे.
सदर बँकेच्या १७ सदस्यीय संचालक मंडळासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर आज, सोमवारी सकाळी ८ वाजेपासून श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात मतमोजणी सुरु केली गेली. ही निवडणूक पसंतीक्रमावर आधारित असल्याने त्यात इव्हीएमचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मतपत्रिकांच्या आधारे ती घेण्यात आली. मतपत्रिका असल्याने त्या मोजण्यासाठीही बराच वेळ लागला. सायंकाळी पाचच्या सुमारास पहिला निकाल हाती आला. त्यानंतर एकामागोमाग एक असे सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित झाले.
शिवपरिवारातील महत्वाची संस्था
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही शिव परिवारातील अत्यंत महत्वाची संस्था आहे. या संस्थेतील बहुतेक कर्मचारी सदर बँकेचे सभासद आहेत. बँकेच्या मतदारांचा व्याप केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर यवतमाळ, अकोला व वर्धा जिल्ह्यातही काही प्रमाणात विस्तारला आहे. या निवडणुकीत ३२ हजार ६४६ मतदारांपैकी केवळ ११ हजार ४३० (३५.०१ टक्के) मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.