आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या विविध यशामध्ये पुन्हा एक भर पडली आहे. महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. पंकज नागपुरे यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा समजला जाणारा ‘इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स-दिनबंधू साहू स्मृती पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. राज्यातील एखाद्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला प्रथमच हा पुरस्कार मिळाला असून, यापूर्वी हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्व प्राध्यापक आयआयटीसारख्या नामवंत संस्थांमधील शिक्षक आहेत.
पदवी स्तरावरील आपल्या प्रयोगशील अध्यापन, नावीन्यपूर्ण कृती युक्त अभ्यासक्रम आणि समाजोपयोगी संशोधन अशा तिन्ही पातळ्यांवर अमूल्य योगदानामुळेच त्यांनी आपले नाव या पुरस्कारावर कोरले आहे. पाटलीपुत्र विद्यापीठ, पटेना (बिहार) येथे आयोजित इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचरेस (आयएपीटी) या नामांकित संस्थेच्या वार्षिक संमेलनात पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयसीटी ही राष्ट्रीय स्तरावरील भौतिकशास्त्र शिक्षक संघटना आहे. संपूर्ण देशात विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून भौतिकशास्त्र अध्यापन आणि भौतिकशास्त्र शिक्षकांचा स्तर वृद्धिंगत करण्याचे काम ही संस्था करित आहे. महाविद्यालयाच्या उपक्रमशील अध्यापन पद्धतीचे द्योतक संपूर्ण समाजापर्यंत या निमित्ताने पोचल्या ची गौरव भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोपरे यांनी यावेळी व्यक्त केली.
या पुरस्काराच्या निमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारी सदस्य, आजीवन सभासद, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बर्डे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी डॉ. नागपुरे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. एका राष्ट्रीय संस्थेद्वारे हा पुरस्कार जाहीर झाल्याबरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी डॉ. नागपुरे यांचे कौतुक करीत संस्थेच्या इतर प्राध्यापकांसाठी ही प्रेरणादायक उपलब्धी असल्याचे म्हणत त्यांचे विशेष अभिनंदन केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.