आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. भाऊसाहेबांनी मागासवर्गीय, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरू राहील अशी ग्वाही देतानांच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे १२५ वे जयंती वर्ष शासनाद्वारे साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अमरावतीत केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खा. डाॅ. अनिल बोंडे, खा.नवनीत राणा, आ. सुलभा खोडके, आ. प्रवीण पोटे, आ.परिणय फुके, आ.श्वेता महाले, आ.प्रा.अशोक उईके, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ५० लाखाच्या बसची मागणी केली आहे. यासाठी डीपीसीतून निधी द्यावा, अशी मागणी खा. नवनीत राणा यांनी केली. संचालन प्रा. किशोर फुले तर आभार प्रदर्शन दिलीप इंगोले यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.