आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Dr. Vijaykumar Chobe Is The New Vice Chancellor Of Amravati University; Finally, On The Twenty first Day, The Proclamation Was Accepted From The Raj Bhavan

पदभार स्वीकारला:अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ विजयकुमार चोबे; अखेर एकविसाव्या दिवशी राजभवनातून घोषणा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदावरील व्यक्तीची अखेर एकवीसाव्या दिवसी राजभवनातून घोषणा करण्यात आली. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार चौबे यांची या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले असून आज, बुधवारी त्यांनी आपली नवी जबाबदारी स्वीकारली.

दिव्य मराठीचा इम्पॅक्ट

प्र-कुलगुरु पदाची निवड रखडल्याने व दरम्यानच्या काळात कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने ‘दिव्य मराठी’ने 30 मे रोजीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. डॉ. चौबे हे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे प्रमुख असतानाच मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कार्याची पावती दिली आहे.

या पदावर वर्णी लावण्यासाठी गेल्या महिण्यातच मोर्चेबांधणी सुरु झाली होती. त्यासाठी कुलगुरू डॉ. मालखेडे यांच्यामार्फत राजभवनाकडे पाच नावे पाठविण्यात आली होती. त्यामध्ये माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, भारतीय महाविद्यालयाचे डॉ. यु. एस. पाटील, विद्यापीठ शिक्षण विभागाचे गजानन गुल्हाने, विधी शाखेचे डॉ. विजयकुमार चौबे व अकोला येथील एलआरटी कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके यांचा समावेश आहे. 9 मे रोजी या सर्वांच्या मुलाखतीही आटोपल्या होत्या.

विद्यार्थी हिताला प्राधान्य

गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मी या विद्यापीठाशी जुळलेला आहो. शिक्षक या नात्याने विद्यार्थी हित जपणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी आतापर्यंत निभवित आलो. भविष्यातही याच कर्तव्याची जाण ठेऊन मी विद्यार्थी हिताला प्राधान्य देईल. असे प्र कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...