आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्य स्पर्धा:नाट्यतपस्वी राजाभाऊ मोरे यांना अ. भा. नाट्य परिषदेतर्फे ‘जीवन गौरव’

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा “ जीवनगौरव पुरस्कार “ नाट्य तपस्वी राजाभाऊ मोरे यांना जाहीर झाला आहे. अतिशय प्रतिष्ठित असणारा हा पुरस्कार सोमवार, ५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात त्यांना बहाल केला जाईल.

विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. रणजित पाटील, नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य शिवराय कुलकर्णी, माजी महापौर तथा मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष विलास इंगोले आदी उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.

राजाभाऊ मोरे हे नाट्य क्षेत्रातील दिग्गज असतानाच येथील सुप्रसिद्ध आझाद हिंद मंडळाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर टाकली आहे.तत्कालीन नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनात ३३ वर्षांपूर्वी राजाभाऊ मोरे यांनी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली. . अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा राजाभाऊ यांनी नाट्य चळवळ सुरु केली, रुजवली आणि वाढवली. आझाद हिंद मंडळाच्या वतीने सतत ४० वर्षे चालविण्यात आलेल्या नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी विविधांगी नाटकं सादर केली आहेत. एवढेच नव्हे तर स्पर्धा जिंकून अनेक पुरस्कारही मिळवले. राजाभाऊंनी शंभरपेक्षा जास्त नाटकांना दिग्दर्शित केले, नेपथ्य दिले. प्रत्येक नाट्य संस्थेला मदत करण्यास सतत तत्पर असनारे राजाभाऊ सामाजिक, राजकीय, क्रीडा विभागातसुद्धा सतत कार्यरत असतात.रंगभूमीला समर्पित असलेल्या त्याच्या जीवनाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत असल्याचे अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष तथा नाट्य स्पर्धेचे समन्वयक अॅड. चंद्रशेखर डोरले आणि सहसमन्व्यक विशाल फाटे यांनी कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...