आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवालदिल:दरवाढीच्या प्रतिक्षेत कापूस‎ उत्पादकांचे स्वप्न उद्ध्वस्त; हंगाम संपत असतानाही दिलासा नाही‎

अमरावती3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किनगावराजा‎ दरात शेवटच्या टप्प्यात वाढ होईल या अपेक्षेने ‎ ‎ साठवून ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांचे‎ स्वप्न उद्ध्वस्त केले आहे. कापसाला मिळत‎ असलेला निचांकी दर पाहता या शेतकऱ्यांचे ‎ ‘पांढरे सोने’ कवडीमोल ठरत असल्याचा अनुभव त्यांना येत आहे.‎

कापूस हे नगदी पीक आहे. मात्र, उत्पादन ‎खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि त्यातच लक्षणीय प्रमाणात घसरलेले भाव यामुळे ‎शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामातील कापूस ‎घरातच साठवून ठेवला. आज नाही तर उद्या‎ भाव वाढतील या आशेने कापसाची‎ साठवणूक केली.

मात्र, कापसाचे भाव काही वाढले नाहीत. कापूस दरात शेवटच्या टप्प्यात‎ वाढ होईल, अशी अपेक्षा करणाऱ्या‎ शेतकऱ्यांचे भाववाढीचे स्वप्न उद‌्ध्वस्त‎ झाले.‎ सद्य:स्थितीत कापसाचे दर नीचांकी‎ पातळीवर असून, शेतकऱ्यांचे मोठ्या‎ प्रमाणात नुकसान होत आहे. हंगामाच्या‎ सुरुवातीस नोव्हेंबर महिन्यात खासगी विक्रीत‎ कापसाला उच्चांकी ९ हजार ४०० रुपयांचा दर‎ मिळाला. त्यानंतर दरात सातत्याने चढ-उतार‎ होत होता.

मागील पाच महिन्यांत कापसाचे‎ दर ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले.‎ शेतकऱ्यांना किमान शेवटच्या टप्प्यात तरी‎ कापूस दरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती.‎ परंतु, हंगाम संपत आला तरी कापूस दरात‎ सुधारणा झाली नाही. दरवाढीच्या दृष्टीने‎ शासनाने गांभीर्य दाखवले नसल्याने ही‎ स्थिती निर्माण झाली आहे. मागील‎ आठवड्यात कापसाला मिळालेले सरासरी‎ दर कायम राहिले. या आठवड्याच्या‎ सुरुवातीला, सोमवारी, दि. २२ मे रोजी‎ कापसाला सरासरी ७ हजार ६५० रुपये‎ प्रतििक्वंटल याप्रमाणे भाव मिळाला.‎