आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिस गुन्हा शाखा:अमरावतीमध्ये 12 लाखांचे ड्रग्ज जप्त

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री ३०० ग्रॅम एमडी घेऊन शहरात येणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एमडी, मोबाइलसह एकूण १२ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे पोलिसांनी मुंबईतील पुरवठादारालाही बेड्या ठोकल्या आहेत. खलिदोद्दीन झामोरीद्दीन (रा. माना, ता. मूर्तिजापूर), अश्फाक अशरफ शेख (नौपाडा, बांद्रा, मुंबई) आणि शोएब अहमद शेख हसन (रा. चांदणी चौक, अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खलिदोद्दीन झामोरीद्दीन व अन्य दोघे अमरावती ते नांदगाव पेठ मार्गावरील हॉटेल मेजवानीजवळ एमडी ड्रग्ज विक्रीबाबत व्यवहार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याआधारे पोलिसांनी तिघांवर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...