आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:दारु पिऊन महिलेस अश्लील शिवीगाळ ; उपराई येथील घटना

दर्यापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशन अर्तंगत येणाऱ्या उपराई गावात जुन्या वादातून तीन जणांनी एका महिलेस अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी रात्री घडला. परंतु महिलेने आज, मंगळवारी तक्रार दिल्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांनाही अटक करुन त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपराई येथील फिर्यादी महिलेसोबत आरोपी सुनील सुरेश वानखडे, कैलास हिंमत खंडारे, सुधाकर किसन खंडारे यांचा जुना वाद होता. या जुन्या वादातून तिन्ही आरोपींनी दारु पिऊन फिर्यादी महिलेस रविवारी रात्री अश्लील शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. महिलेने याबाबतची तक्रार खल्लार पोलिसांत दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून खिल्लार पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार अनुराधा पाटेखेडे, दुय्यम ठाणेदार रामरतन चव्हान, जमादार शरद डहाके, श्रीराव यांनी केली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय अनुराधा पाटेखेडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...