आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली राजी-नाराजी व अंतर्गत गटबाजी आणि अमरावतीत झालेले सर्वांत कमी मतदान हे मुद्दे मावळते आमदार डॉ. रणजित पाटील यांचा टक्का घसरण्यासाठी कारणीभूत ठरले. भाजपचे सर्व पदाधिकारी एकीकडे आणि डॉ. रणजित पाटील एकीकडे अशी अकोल्याची स्थिती आहे. तर अमरावतीत मतदार नोंदणीकडे अधिक कल मात्र मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात नसलेले स्वारस्य, अशी स्थिती होती. त्यामुळे डॉक्टरांना यावेळी गड सर करता आला नाही. तसे पाहता मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेणारा भाजप हा एकमेव राजकीय पक्ष होता. पण तरीही या निवडणुकीने भाजपला तारले नाही. तसे पाहता महाविकास आघाडीचा उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी निश्चित झाला. परंतु तरीही त्यांनी पाटील यांच्या तुलनेत आघाडी घेतली, हे त्यामुळेच अनेकांसाठी धक्कादायक ठरले. अमरावती जिल्ह्यात केवळ ४३.३७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार येथे असूनही फार कमी मतदान झाल्याने ३० जानेवारी या मतदानाच्या दिवशीच भाजपच्या गोटात
अशी आहेत उमेदवारनिहाय पहिल्या पसंतीची मते धीरज लिंगाडे मविआ ४३,३४०डॉ. रणजीत पाटील भाजप ४१,०२७ अनिल अमलकार वंचित बहुजन आघाडी ४,१८१डॉ. गौरव गवई अपक्ष २४० अनिल ठवरे अपक्ष २६अनंतराव चौधरी अपक्ष ७९ अरुण सरनाईक अपक्ष १,५३६ अॅड. आनंद राठोड अपक्ष ३८३धनराज शेंडे अपक्ष २३ अॅड. धनंजय तोटे अपक्ष ७१ निलेश पवार (राजे) अपक्ष १२ उपेंद्र पाटील अपक्ष ६६शरद झांबरे भाजप बंडखोर ४२०श्याम प्रजापती काँग्रेस बंडखोर २०८ डॉ. प्रवीण चौधरी अपक्ष १,६८५प्रवीण बोंद्रे अपक्ष ४४भारती दाभाडे अपक्ष २१५माधुरी डाहारे अपक्ष ९३ संदेश रणवीर अपक्ष ४३लक्ष्मीकांत तडसे अपक्ष १४विकेश गवाले अपक्ष ५१सुहास ठाकरे अपक्ष २५ संदीप मेश्राम अपक्ष ७० एकूण १,०२,५८७
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.