आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:रस्त्याअभावी गणपती विसर्जन न करण्याचा पूर्णा नगरवासीयांचा निर्णय

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर गावातील रस्ता अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणाचा त्रास होत आहे. खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकरिता अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र, शासनाकडून दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसेच काही दिवसांवर गणेशोत्सव असून या काळात रस्ता खराब असल्याने उत्सवावर विसर्जन पडले आहे. त्यामुळे रस्त्या अभावी गणपती विसर्जन न करण्याचा सामूहिक निर्णय पूर्णा नगर येथील गावकऱ्यांनी घेतला आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

पूर्णा नगर हे १२ ते १५ हजार लोकवस्तीचे गाव असून, गावाचा रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहन अथवा पायदळही नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासन आणि शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात सार्वजनिक मंडळाचे तीन गणपती आणि २०० घरगुती गणपती बसतात. तसेच पूर्णानगर लगत असलेल्या गावांमधील गणपतीही विसर्जनसाठी पूर्णा नदीवर येतात. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठं मोठे खड्डे पडले असून, विसर्जनाकरिता नदीपर्यंत कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा गणपती स्थापना करायची परंतु विसर्जन न करण्याचा सामूहिक निर्णय पूर्णा येथील ग्रामस्थांनी घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच राम नगर( प्लॉट) ते नदी पर्यंत रस्ता करून देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, अविनाश किरेकर, सागर ठाकूर, पवन दडगाळे, सुनील वानखडे, मनोज बोबळे, रितेश भातकुलकर, पवन तायडे, राहुल किरेकर, सचिन बंड, सचिन वानखडे, नितीन काटोलकर, गोपाल तायडे, प्रवीण बोबडे, सुबोध खेकडे, सुधीर बोबडे, प्रशांत राऊत, श्याम गवळी, निशांत अग्रवाल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...