आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिवसा बाजार समितीच्या 18‎ जागांसाठी 57 जणांची दावेदारी‎:वीजग्राहकांच्या प्रतिसादामुळे‎ वसुलीच्या उद्दिष्टाने गाठली ‘शंभरी’‎

तिवसा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी २८ एप्रिल रोजी होऊ‎ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या निवडणुकीचे‎ वातावरण आता तापू लागले‎ असून संचालकांच्या १८ पदांसाठी‎ ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले‎ आहेत. विशेष असे की तब्बल ५६‎ अर्ज शेवटच्या दिवशी दाखल‎ झाले. त्यापूर्वीच्या काही दिवसांत‎ केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल‎ झाला होता.‎ एकूण उमेदवारी अर्जांमध्ये‎ एकट्या सेवा सहकारी मतदार‎ संघासाठीचे ३५ अर्ज आहेत.‎ याशिवाय ग्रामपंचायत मतदार‎ संघातून १६ अर्ज, व्यापारी-अडते‎ मतदारसंघासाठी ४ अर्ज तर‎ हमाल-मापारी मतदारसंघासाठी २‎ अर्ज दाखल करण्यात आले आहे.‎

माजी पालकमंत्री अॅड. यशोमती‎ ठाकूर यांचा गृह तालुका‎ असलेल्या तिवसा कृषी उत्पन्न‎ बाजार समितीच्या निवडणुकीची‎ उत्सुकता शिगेला पोहोचली असून‎ अर्ज भरण्याच्या शेवटच्या‎ तारखेपर्यत एकूण ६४ अर्जाची‎ उचल करण्यात आली होती. सेवा‎ सहकारी मतदार संघातून ११‎ प्रतिनिधी निवडणूक द्यावयाचे‎ आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण‎ मतदारसंघातून ७, महिला‎ राखीवमधून २, इतर‎ मागासवर्गीयांमधून १, विमुक्त‎ जाती-भटक्या जमातीमधून १‎ अशाप्रकारे ११ प्रतिनिधींसाठी ३५‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अर्ज दाखल झाले आहेत.‎

ग्रामपंचायत मतदार संघातून ४‎ प्रतिनिधींची निवड करावयाची‎ आहे. यामध्ये सर्वसाधारण मधून‎ २ प्रतिनिधी निवडायचे असून‎ अनुसूचित जाती-जमाती या‎ संवर्गासह आर्थिक दुर्बल‎ घटकातून प्रत्येकी एक संचालक‎ निवडावा लागेल. त्यासाठी १६‎ अर्ज दाखल झाले आहेत. अडते‎ व व्यापारी मतदार संघातील दोन‎ प्रतिनिधींसाठी ४ अर्ज प्राप्त झाले‎ असून हमाल व मापारी मतदार‎ संघाच्या एका प्रतिनिधीसाठी २‎ अर्ज दाखल झाले आहेत.‎ निवडणुकीकडे तिवसा‎ तालुक्यासह परिसरातील‎ नागिरकांचे लक्ष लागले आहे.‎