आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ले:होळी, धुलिवंदनाच्या दोन दिवसात तीन ठिकाणी प्राणघातक हल्ले ; शहरातील विविध ठिकाणी जीवघेणा हल्ला

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी व धूलिवंदनाच्या दोन दिवसात शहरातील विविध ठिकाणी जीवघेणा हल्ला करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये एक घटना होळीच्या दिवशी १७ मार्चला नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडली असून, दोन्ही गटाने एकमेकांवर जीवघेणा हल्ला चढवला तर दोन घटना धूलिवंदनाच्या दिवशी घडल्या आहेत. शुक्रवारी (दि. १७) नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोशन नगरमध्ये ट्रक उभा करण्याच्या वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. यअब्दुल फईम अब्दुल रऊफ (३०, रोशन नगर) आणि मकबूल शाह हबीब शाह (५१,रोशन नगर) अशी जखमींची नावे आहेत.

या घटनेत नागपुरी गेट पोलिसांनी अब्दुल फईम याच्या तक्रारीवरून मकबूल शाह, मोहीम शाह, आकिब, फैजान नुरुद्दीन, गुड्डू शाह (रहमत नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. तर मकबूल शाह यांच्या तक्रारीवरून अब्दुल फईम अब्दुल रऊफ, अब्दुल सज्जू अब्दुल रऊफ, अब्दुल दानिश अब्दुल रऊफ यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच गाडगे नगर ठाण्याच्या हद्दीतील ट्रान्सपोर्ट नगर स्थित शिवशक्ती आईस्क्रीम सेंटरजवळ शोएब परवेज अब्दुल रशीद (३४, जमील कॉलनी) याच्यावर शनिवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास रफिक पहिलवान याच्यासह चौघांनी चाकूने हल्ला केला. शोएब परवेज चहाच्या दुकानाजवळ उभा होता. त्याचदरम्यान रफिक पहिलवान तेथून जात असताना त्यांनी एकमेकांना रागाने पाहिले. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. शोएब परवेज रफिक शेखच्या तक्रारीवरून गाडग नगर पोलिसांनी चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

तसेच तिसरी घटना रंगपंचमीच्या दिवशी रहाटगाव स्थित हॉटेल आदित्य मध्ये घडली. अक्षय सुनील इंगळे (देशमुख) (२४, रहाटगाव) या तरुणावर राहुल इंगळे नामक व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी राहुल इंगळे (२८, रा. अर्जुन नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...