आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोकरी, रोजगार, व्यवसाय यामुळे सध्या स्थलांतर हा बहुतेक कुटुंबांसाठी अनिवार्य विषय झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची व्याख्या ही ‘हम दो-हमारे दो’, अशी झाली असून भरपूर सदस्य संख्या असलेली कुटुंबं बोटावर मोजण्याइतपतच उरली आहे.
असेच एक अपवादात्मक संयुक्त कुटुंब अमरावतीचे हृदयस्थळ समजल्या जाणाऱ्या राजकमल चौक परिसरात वास्तव्यास असून, या कुटुंबात तब्बल १३ सदस्य एकत्र रहात आहेत. एक आई, तिची तीन मुले, तीन सुना आणि प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा नातवंडे असा हा कुटुंबकबिला आहे. संयुक्त कुटुंब प्रथा मोडीत निघत असतानाच ‘मायक्रो फॅमिली’ हा अलिकडचा शिरस्ता बनतो आहे. त्यातही शहरी भागात हे प्रमाण अधिक वाढले आहे. अशा स्थितीत भरपूर फळ, फुलांनी लदबदलेल्या एखाद्या वृक्षाप्रमाणे हे संयुक्त कुटुंब वास्तव्यास असून या कुटुंबाचा सांभाळ करताना मला परमोच्च आनंद मिळतो, असे ज्येष्ठ सदस्य उषाबाई नरेंद्र वासेवाय यांचे म्हणणे आहे.
तिन्ही मुले, सुना आणि नातवंडे यांना कवेत घेऊन त्यांना एकाच छताखाली एकवटून ठेवणाऱ्या उषाबाई या नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्यात आघाडीवर असलेल्या येथील वीर वामनराव जोशी शाळेच्या निवृत्त कर्मचारी आहेत. दरम्यानच्या काळात काळाने झडप घेऊन पतींना त्यांच्यापासून कायमचे दूर नेले. मात्र उषाबाईंनी जराही हिम्मत ढासळू न देता आपला नेटका संसार कायम ठेवला. तिन्ही मुलांचे शिक्षण, त्यांचे रोजगार, विवाह आदी जबाबदाऱ्या पूर्ण करुन सध्या नातवंडांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या कुटुंबातील तिन्ही भावांना प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा अपत्ये आहेत. ही लहान-मोठी अपत्ये म्हणजे या घराचे खरेखुरे चैतन्य आहे, असे उषाबाई मोठ्या अभिमानाने सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.