आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन सतर्कता:आस्थापनाधारक, व्यापारी, हॉकर्ससाठी डस्टबिन बंधनकारक; अन्यथा होणार दंड

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. याच अनुषंगाने शहराच्या विविध भागात डस्टबिन बसवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. शहरातील आस्थापनाधारक, व्यापारी, फेरीवाल्यांनी डस्टबिन ठेवणे अनिवार्य असून, डस्स्टबिन न ठेवल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्याचे निर्देश मनपा प्रशासकांनी दिले आहेत. कचरा हा कचरापेटीत टाकून घंटागाडीत द्यावा.

शहरात घनकचरा प्रकल्प उभारताना कचऱ्याचे ओले व सुके असे विलगीकरण करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोगदेखील अमरावती महापालिकेच्या वतीने केला जाणार आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत मनपाने सर्व वॉर्डातील प्रत्येक घर, सोसायटी व व्यापारी संकुलांना विलगीकरणाची सक्ती करत डस्टबिनचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मनपाने डस्टबिनमधील कचऱ्याचे विलगीकरण करून तो वाहून नेण्यासाठी वाॅर्डांमध्ये घंटागाड्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. वॉर्डाची व्याप्ती व बाजार भागातील व्यापाऱ्यांची दुकाने व संकुले लक्षात घेऊन स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) तथा उपायुक्त डॉ. सीमा नेताम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...