आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी रूजू

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण अमरावती परिमंडळ मुख्य अभियंतापदी ज्ञानेश कुलकर्णी हे सोमवारी रूजू झाले आहेत. यापूर्वीच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांची गोंदिया येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. विजेसारखी अत्यावश्यक सेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यावर भर राहणार असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

तत्कालीन वीज मंडळ आणि आता महावितरणसारख्या महत्वाच्या आणि राज्यव्यापी वीज कंपनीत काम करताना कनिष्ठ अभियंता ते अधीक्षक अभियंता असा २८ वर्षाचा विशेषत: पारेषण, चाचणी आणि वाणिज्यिक विभागातील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

ज्ञानेश कुलकर्णी यांनी केलेल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामाची दखल घेत महाराष्ट्र शासन व महावितरणकडून त्यांना २०१४ मध्ये जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले होते. ज्ञानेश कुलकर्णी यांची पदोन्नतीवर अमरावती येथे बदली झाली असून, यापूर्वी ते अधीक्षक अभियंता वाणिज्य आणि ओपन एक्सेस म्हणून मुख्य कार्यालय येथे जबाबदारी सांभाळत होते.

बातम्या आणखी आहेत...