आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणा, भाजपकडून ‘लव्ह जिहाद’ प्रकाराचा आरोप:बेपत्ता तरुणीवरून खा. राणा आणि पोलिस आमने-सामने

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीतील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक १९ वर्षीय युवती मंगळवारी (दि. ६) दुपारी घरून कॉलेजसाठी गेली आणि बेपत्ता झाली. त्या संदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, बुधवारी (दि. ७) दुपारी बाराच्या सुमारास अमरावतीच्या खा. नवनीत राणा राजापेठ पोलिस स्टेशनला पोहोचल्या. या प्रकरणाबाबत चर्चा करत असताना त्यांनी राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर आरोप केला की, तुम्ही माझा कॉल का रेकॉर्ड केला. यावरून पोलिस ठाण्यात चांगलाच गदारोळ झाला होता. या वेळी पोलिस आणि खा. राणा आमने-सामने आले होते.

युवती बेपत्ता झाल्यानंतर खा. नवनीत राणा व भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांनी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी एका संशयित युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. मात्र मंगळवारी रात्रीपर्यंत सदर युवतीचा शोध लागला नव्हता.

तरुणीचा शोध सुरू ^खा. नवनीत राणा यांनी राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर आरोप केला की, त्यांनी मुद्दामहून कॉल रेकॉर्ड केला. वास्तविक सध्या बहुतांश मोबाइलमध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्ड होतात. या प्रकरणात आम्ही तरुणीचा शोध घेण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न करत आहोत. तरुणी ताब्यात आल्याशिवाय नेमके प्रकरण काय आहे ते सांगता येणार नाही. - विक्रम साळी, पोलिस उपायुक्त.

बातम्या आणखी आहेत...