आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:‘छायाचित्र प्रदर्शनातून शासकीय योजना, उपक्रमांची प्रभावी मांडणी’; असे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना पोलिस आयुक्त डॉ. सिंह यांनी केली

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकास कामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनात शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे मांडली आहे. या उपक्रमाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी केले.

राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत राबवलेल्या विविध योजना आणि विकास कामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मंगळवारी या प्रदर्शनाला पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली. विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक हर्षवर्धन पवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर या वेळी उपस्थित होत्या. शासनाच्या योजना व त्याची फलश्रुती प्रदर्शनातून सचित्र सादर केली आहे. गृह विभागातर्फे डायल ११२ सारखे उपक्रम हाती घेण्यात आलेत. आयुक्तालय स्तरावरही पोलिस विभागाकडून अनेकविध उपक्रम राबवण्यात येतात. असे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा स्तरावरही असे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना पोलिस आयुक्त डॉ. सिंह यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून, कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या असून, या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती नागपूर-अमरावती विभाग संचालक हेमराज बागुल तसेच प्रभारी उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...