आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या दोन संशोधकांचे प्रयत्न:जखमेत पस निर्माण करणाऱ्या जिवाणूचा शोध घेणारे किट तयार

अनुप गाडगे । अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 तासांत निष्कर्ष, खर्चही कमी

शरीराच्या कोणत्याही भागाला जखम झाल्यानंतर स्टेफालोकोकस ऑरिअस नावाचा जिवाणू जखमेत पस (पू) तयार करतो. त्यामुळे जखम चिघळून माेठी होते. अशा वेळी जखमेत मेथिसिलीन रेझिस्टंट स्टेफालोकोकस ऑरिअस (एमआरएसए) तयार होऊ शकतो. या जिवाणूचा शोध घेऊन त्याचा तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा रुग्णाची जखम आणखी गंभीर होते. दरम्यान, सध्या या जिवाणूची चाचणी करण्यासाठी २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो. शिवाय खर्चही अधिक लागतो. यावर उपाय म्हणून अमरावतीच्या संत गाडगे बाबा विद्यापीठातील जीव-तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. प्रशांत ठाकरे आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डाॅ. नीरज धनवटे या संशोधकांनी एमआरएसए जिवाणूची चाचणी करणारी नवी किट विकसित केली आहे. ही किट अवघ्या ७ तासांत रिपोर्ट देते आणि त्यासाठी केवळ २०० रुपये खर्च येतो. या संशोधकांनी या किटचे पेटंटसुद्धा मिळवले आहे.

डाॅ. ठाकरे व डॉ. धनवटे हे एमआरएसए किट विकसित करण्यासाठी संशोधन करत होते. त्यावेळी पीडीएमसीमधील डाॅ. प्रमोद भिसे यांनी आवश्यक पसचे नमुने पुरवले. त्यामुळे त्यांचाही या संशोधनात वाटा आहे. या दोन संशोधकांनी विकसित केलेल्या किटचे पेटंट मिळवण्यासाठी २०१७ पासून प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांना २०२१ मध्ये हे पेटंट मिळाले आहे.

काेविड विषाणू प्रयोगशाळेचे ठाकरे नोडल अधिकारी
डॉ. प्रशांत ठाकरे हे अमरावती विद्यापीठात वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या कोविड १९ विषाणू प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉ. धनवटे या तांत्रिक अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. या प्रयोगशाळेत आतापर्यंत कोविडच्या अडीच लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...