आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:पायाभूत सुविधांबरोबरच जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न; पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांची माहिती

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच जास्तीत जास्त रोजगारनिर्मितीचा प्रयत्न आहे. विविध उद्योग, लघु उद्योगांद्वारे औद्योगिक विकास व भरीव रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी वणी ममदापूर येथे सांगितले.

तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर येथे दीड कोटी रूपये निधीतून रामा ३०० पासून दापोरी, जावरी, काटसूर ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्यांची सुधारणा, भराव पूल बांधकाम, मोरी बांधकाम या विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जि.प. सभापती पूजा आमले, पं. स. सभापती शिल्पा हांडे, मुकूंद पुनसे, उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याचा शुभारंभ व ममदापूर सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.

रस्ते, पूल, नाल्या, इमारती अशा विविध पायाभूत सुविधांची कामे जिल्ह्यात सर्वदूर होत आहेत. अनेक कामांची मनरेगाशी सांगड घातल्याने रोजगारनिर्मिती साध्य होत आहे. तिवसा तालुक्यात ४० कोटींची कामे होत आहेत. मनरेगातून अधिकाधिक कामांना चालना द्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.यावेळी त्यांनी ममदापूर येथील आरोग्य उपकेंद्र बांधकामाची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...