आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद:शेंदुरजनाघाट येथे ईद उत्साहात; हा अनोखा उपक्रम शेंदुरजनाघाट पोलिसांनी सामाजिक ऐकोपा व शांतता कायम ठेवत राबवला

शेंदुरजनाघाट11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस स्टेशनकडून रमजान ईद निमित्त वाई रोड येथील ईदगहावर मुस्लिम बांधवांना नागरिक, शांतता समितीचे सदस्य व ठाणेदार सतीश इंगळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्यात. हा अनोखा उपक्रम शेंदुरजनाघाट पोलिसांनी सामाजिक ऐकोपा व शांतता कायम ठेवत राबवला.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरातच ईद साजरी केली. मात्र या वर्षी निर्बंध हटताच ती सामाजिक स्वरुपात साजरी करण्यात आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले.

शहरावासीयांनी देखील सामाजिक एकोपा जपत ईदच्या शुभेच्छा दिल्यात. वाई रोड येथील ईदगहावर नमाज अदा करण्यासाठी मोठया संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...