आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:शिक्षक आत्महत्येप्रकरणी दोन शिक्षकांसह आठ जणांवर गुन्हा

परतवाडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय शिक्षकाने परिचितांना मागील काही वर्षांपूर्वी रक्कम उधार दिली होती. मात्र, वारंवार मागणी करुनही त्यांनी रक्कम परत न केल्यामुळे शिक्षकाने २८ ऑक्टोबर २०२२ ला गळफास लावून आत्महत्या केली होती. शिक्षकाने मृत्यू पूर्व लिहिलेली चिठ्ठी व मृत शिक्षकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी गुरुवारी (दि. ८) सायंकाळी दोन शिक्षकांसह आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

राजकुमार वासुदेवराव खडसे (५०, रा. संतोषनगर, परतवाडा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी २८ ऑक्टोबरला घरीच आत्महत्या केली आहे. दरम्यान, मृत्यू पूर्व चिठ्ठी व राजकुमार यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. खडसे यांनी आठ व्यक्तींकडून सुमारे १८ लाख रुपये घेणे होते. खडसे यांना ही रक्कम घेऊन त्यांच्यावर असलेले कर्ज चुकवायचे होते. मात्र, त्यांना ही रक्कम न मिळाल्यामुळे ते तणावात आले व त्यांनी आत्महत्या केली, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्या आधारे पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...