आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्र निर्माणात योगदान देण्याचे काम करणार एकल विद्यालये:जिल्ह्यात 330 गावांमध्ये स्थापना; राष्ट्रीय कार्याध्यक्ष माहेश्वरी यांची माहिती

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेला उपस्थित डावीकडून पुष्पाताई बोंडे, लप्पीसेठ जाजोदिया, रामावतार अग्रवाल, वनबंधू परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश माहेश्वरी, सरिता मानसिंगका, मनी गोयनका व इतर. - Divya Marathi
पत्रकार परिषदेला उपस्थित डावीकडून पुष्पाताई बोंडे, लप्पीसेठ जाजोदिया, रामावतार अग्रवाल, वनबंधू परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश माहेश्वरी, सरिता मानसिंगका, मनी गोयनका व इतर.

वनबंधू परिषद ही राष्ट्र निर्माणात योगदानासाठी कटिबध्द असून एकल विद्यालयाच्या माध्यमातून तेच काम केले जाते, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश माहेश्वरी यांनी शनिवारी (23 जुलै) दिली.

नागरिक घडवणे हे एकल विद्यालयाचे ध्येय

वनबंधू परिषदेच्या अमरावती जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून या कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभासाठी माहेश्वरी येथे आले होते. यावेळी महेश भवनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्यामते देशभरात सध्या 45 हजार गावांमध्ये एकल विद्यालये चालविली जात असून त्यापैकी 330 अमरावती जिल्ह्यात विशेषत: मेळघाटात आहेत. शिक्षण, आरोग्य, संस्कृती, जागरण व ग्रामविकास या पाच मुद्द्यांची मांडणी या विद्यालयांद्वारे केली जाते. राष्ट्र उभारणीसाठी योगदान देऊ शकेल, असा नागरिक घडवणे हे एकल विद्यालयाचे ध्येय आहे.

माहेश्वरी यांचे मार्गदर्शन

शाळेच्या बाहेरची शाळा अशी एकल विद्यालयाची रचना आहे. या विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याच गावातील अनौपचारिक शिक्षकाद्वारे दिवसातून अडीच ते तीन तास शिक्षण दिले जाते. 1989 साली पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून वनबंधू परिषदेच्या कामाचा प्रारंभ झाला. त्यानंतर हळूहळू देशभर या संस्थेचा विस्तार झाला असून लवकरच 1 लाख गावांमध्ये पोहचण्याचा संकल्प पूर्णत्वास जाईल, असेही माहेश्वरी यांनी यावेळी स्पष्ट केले. अमरावतीची शाखा ही विदर्भातील सर्व शाखांमध्ये वेगळेपणाचा ठसा उमटवणारी शाखा ठरणार असल्याबद्दलचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेळघाटातील एकल विद्यालयांवर नागपुरच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष ठेवताना अडचणी जात होत्या, अमरावतीत शाखा स्थापन झाल्यामुळे ती अडचण दूर झाली असून ‌भविष्यात आणखी सक्षमपणे काम करता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेपूर्वी आमदार रवि राणा, अॅड. आर. बी. अटल, नानक आहूजा आदी मान्यवरांसह संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमरावती शाखेची रितसर घोषणा करण्यात येऊन सर्व पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

पत्रकार परिषदेला अमरावती शाखेचे अध्यक्ष लप्पीसेठ जाजोदिया, माजी आमदार पुष्पाताई बोंडे, विदर्भ कार्यकारिणीच्या अध्यक्ष सरिता मानसिंगका, महिला आघाडीच्या विदर्भ अध्यक्षा मनी गोयनका, मेळघाटमधील एकल विद्यालयांचे संचालक गिडवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे आहेत अमरावतीचे पदाधिकारी

संरक्षक अ‍ॅड आर. बी. अटल व कृष्णकुमार टावरी, अध्यक्ष लप्पीसेठ जाजोदिया, उपाध्यक्ष पुरणसेठ हबलानी, दिलीपभाई पोपट, दिनेश सेठिया व किशोर गोयनका, सचिव सुमीत कलंत्री, कोषाध्यक्ष ठाकुरदास लढ्ढा, कार्यकारिणी सदस्य विजय शर्मा, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, अ‍ॅड. ब्रजेश शर्मा, योगेश राठी, सुरेश जैन, विनोद कलंत्री, प्रकाश तेटू, मनीष अग्रवाल, प्रमोदसिंग ठाकूर, अजय अग्रवाल, संजय हरवानी, वसंत निमजे व डॉ. अरुण मोंढे.

बातम्या आणखी आहेत...