आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम:मेळघाटातील सुसर्दा येथे लहान भावाने केलेल्या मारहाणीत मोठ्या भावाचा खून

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुसर्दा येथील दोन भावांमध्ये दारु पिताना वाद झाला. यावेळी लहान्याने मोठ्या भावाला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणात धारणी पोलिसांनी लहान भावाविरुद्ध गुरूवारी (दि. १) पहाटे गुन्हा दाखल केला आहे.

मगनसिंग अर्जुनसिंग सूर्यवंशी (४०, रा. सुसर्दा) असे मृताचे तर मंगलसिंग अर्जुनसिंग सूर्यवंशी (३५, रा. सुसर्दा) असे मारेकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मगनसिंह यांच्यासोबत वाद झाल्याने पत्नी गंगा (३४) या मुलीला सोबत घेऊन मोठ्या आईकडे निघून गेल्या होत्या. तर मुलगा हा वडील मगनसिंग यांच्यासोबत घरीच होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच २५ ऑगस्टला रात्री मगनसिंग व मंगलसिंग हे दोघे भाऊ सोबत दारू पित बसले होते. यावेळी दोघांत वाद झाला. या वादात मंगलसिंग याने मोठा भाऊ मगनसिंग यांच्यावर लाकडी मुसळने हल्ला चढवला. यामध्ये मगनसिंग गंभीर जखमी झाले. त्यानंतर मंगलसिंग हा मगनसिंग यांचा मुलगा स्वस्तिकला घेऊन तेथून निघून गेला. हा प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर मगनसिंग यांना उपचाराकरिता धारणी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथून त्यांना अमरावतीला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २८ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी पत्नी गंगा यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गंगा ह्या तातडीने गावी सुसर्दा येथे आल्या. दीर मंगलसिंगच्या मारहाणीत पती मगनसिंगचा मृत्यू झाला असून मुलाला घेऊन तो कुठेतरी निघून गेला, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार गंगा यांनी धारणी पोलिस ठाणे गाठून दीर मंगलसिंगविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी मंगलसिंगविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...