आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरपंचाच्या ६ आणि सदस्यांच्या ४१३ जागा बिनविरोध झाल्यामुळे ग्रामपंचायतींच्या ४१९ जागांसाठीची प्रत्यक्ष निवडणूक टळली आहे. आगामी १८ डिसेंबर रोजी या जागांसाठी मतदान घेतले जाणार होते. परंतु एवढ्या जागा अविरोध विजयी झाल्यामुळे आता २५७ सरपंचांपैकी २५१ तर सदस्यांच्या ४ हजार ८५८ पैकी ३ हजार ८५२ जागांसाठी निवडणूक घेतली जाईल. त्यासाठी अनुक्रमे १ हजार ६ आणि ३ हजार ८५२ उमेदवार मैदानात आहेत. बिनविरोध विजयी झालेल्या ४१३ सदस्यांमध्ये सर्वाधिक ५९ सदस्य दर्यापूर तालुक्यातून अविरोध विजयी झाले. त्या खालोखाल ५१ चिखलदरा, ४१ नांदगाव खंडेश्वर, ३८ धारणी, प्रत्येकी ३१ वरुड व मोर्शी, ३० चांदूर बाजार,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.