आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका घेण्याचे आदेश:२५ ऑगस्टला ६ सरपंचांची निवडणूक

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या सहा ग्रा.पं.च्या सरपंचांची निवडणूक २५ ऑगस्ट रोजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले. सरपंचांची पदे रिक्त झाल्यामुळे कठोरा, वझ्झर, चिरोडी, गणोजादेवी, जळका पटाचे व हिरुळ पूर्णा या सहा ग्रा.पं.मध्ये निवडणूक घोषित झाली होती.

परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार, मध्यंतरी ती स्थगित केली होती. बुधवारी आयोगाने नवे पत्र पाठवून ह्या निवडणुका घेण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी तहसीलदारांना पत्रे पाठवून २५ ऑगस्ट रोजी निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...