आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक:अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख यांची फेरनिवड, 9 पैकी 8 जागा 'प्रगती'ला

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून लौकिक असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख यांची फेरनिवड झाली. त्यांना ३८९ मते मिळाली. तर, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी नरेशचंद्र ठाकरे यांना २७२ मते मिळाली.

रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीत ७७४ पैकी ६७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, नऊ सदस्यीय कार्यकारिणीमध्ये हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रगती पॅनलने आठ जागा जिंकल्या. केवळ एक जागा प्रतिस्पर्धी विकास पॅनलच्या वाट्याला गेली आहे.

कार्यकारिणीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडेसात वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम सदस्य नंतर उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि अध्यक्ष असा मतमोजणीचा क्रम होता. कोषाध्यक्षपदी दिलीप इंगोले तर उपाध्यक्षपदी अ‌ॅड. गजानन पुंडकर, अ‌ॅड. भय्यासाहेब पुसदेकर पाटील व केशव मेतकर विजयी झाले. कार्यकारिणीची चारही सदस्यपदे हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलने जिंकली आहेत.

​​​​निकालानुसार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक ३९२ मते अ‌ॅड. गजानन पुंडकर तर दुसऱ्या क्रमांकाची ३१८ मते अ‌ॅड. जयवंत ऊर्फ भैय्यासाहेब पाटील पुसदेकर यांना मिळाली. २९५ मते घेऊन विकास पॅनलचे केशव मेतकर उपाध्यक्षाच्या तिसऱ्या पदावर विजयी झाले.

कार्यकारिणीच्या चार सदस्यांसाठी एकूण १० जण मैदानात होते. त्यापैकी हेमंत काळमेघ (४९०), केशवराव गावंडे (३८७), सुरेश खोटरे (३३१) व सुभाष बनसोड विजयी झाले. पराभूत सहा उमेदवारांमध्ये दिनकर गायगोले, सुरेंद्र आडे, रमेश हिंगणकर, आनंद देशमुख, प्राध्यापक प्रमोद झाडे व नरहरपत होले यांचा समावेश आहे.

असा आहे संस्थेचा व्याप

देशाचे प्रथम कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी डिसेंबर १९३२ मध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. सद्यस्थितीत अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेसह २४ वरिष्ठ महाविद्यालये, १५४ कनिष्ठ महाविद्यालये, ७५ माध्यमिक शाळा आणि ३५ वसतिगृहे असा या संस्थेचा व्याप आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...