आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिनेट (अधीसभा) सदस्यांमधून व्यवस्थापन परिषद आणि इतर समित्यांवर पाठवावयाच्या सदस्यांसाठी आगामी मंगळवार, १४ मार्च रोजी निवडणूक होत आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशन (नुटा) आणि अभाविप असा जुनाच सामना यावेळीही रंगणार असला तरी संख्याबळामध्ये ‘नुटा’च पुढे आहे. सिनेटची एकूण सदस्य संख्या ७६ आहे. त्यापैकी सात जागा अद्याप रिक्त असून, उर्वरित ६९ सदस्यांमधूनच ही निवड केली जाईल. ६९ सदस्यांमध्ये कुलपती या नात्याने महामहीम राज्यपाल यांचाही समावेश आहे.
अधीसभेतून व्यवस्थापन परिषदेवर (मॅनेजमेंट कौन्सिल) आठ सदस्य निवडावयाचे आहेत. यापैकी ‘नुटा’ चे चार सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये प्राचार्य डॉ. विजय नागरे, प्रा. हरिदास धुर्वे, भय्यासाहेब मेटकर (नोंदणीकृत पदवीधर) व श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख (संस्थाचालकांचे प्रतिनिधी) यांचा समावेश आहे.
उर्वरित चारपैकी अनुसूचित जातीच्या प्राचार्य संवर्गाची एक जागा पात्रतेच्या अटी पूर्ण होत नसल्याने रिक्त राहणार असून तीन जागांचा फैसला आगामी १४ मार्चच्या बैठकीत होणार आहे. या जागांसाठी नुटा विरुद्ध अभाविप अशी एकास-एक लढत आहे. प्राचार्य संवर्गातून सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांना अकोला येथील सीताबाई आर्ट-कॉमर्स-सायन्सचे प्राचार्य डॉ. रामदेव सिकची यांनी आव्हान दिले आहे. शिक्षक संवर्गातून नुटाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्या विरोधात मेहकर येथील डॉ. संतोष कुटे यांची उमेदवारी आहे. तर नोंदणीकृत पदवीधरांच्या एका जागेसाठी ‘नुटा’चे अविनाश बोर्डे विरुद्ध अभाविपचे अमोल ठाकरे असा सामना होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.