आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:वाघोलीत जुळ्या भावंडांना विद्युत शॉक; एकाचा मृत्यू ; खांबावरील गार्डिंग तुटून खाली पडल्याने घटना

शिरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथे १३ वर्षीय जुळ्या भावंडांना विद्युत शॉक लागला. यामध्ये एका मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली आहे. प्रणय विद्याचरण थोरात (१३, रा. तळेगाव ठाकूर) असे मृतक मुलाचे आणि प्रज्ज्वल विद्याचरण थोरात (१३) असे जखमी मुलाचे नाव अहे. प्रणय व प्रज्ज्वल हे जुळे भाऊ असून उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे वाघोली येथे आजोबा बाळू झिंगूजी वानखडे यांच्याकडे आले होते. गुरुवारी सकाळी ते दोघेही गावातच ग्रा.पं. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून पाण्याच्या पाइपच्या ओव्हर फ्लोमध्ये आंघोळ करण्यास गेले होते. अंघोळीनंतर टाकीच्या बाजूला एक छोटेसे झाड असून त्या झाडाच्या सावली खाली गेले. या झाडाला लागूनच इलेक्ट्रिक पोल असून, त्या पोलला असलेली गार्डिंग तार खाली तुटून पडली होती. त्या गार्डिंगच्या तारेला प्रणयचा स्पर्श होताच त्याला शॉक बसला. प्रणयने आरडाओरड केली असता बाजूलाच आंघोळ करत असलेला त्याचा भाऊ प्रज्ज्वल प्रणयच्या बचावासाठी धावत गेला. त्यावेळी प्रज्वलच्या हातालासुद्धा तारेचा स्पर्श झाला व शॉक लागला. या घटनेत प्रणय जागेवरच मृत्यूमुखी पडला तर प्रज्ज्वल जखमी झाला. घटनेची माहिती पोलिस पाटील प्रवीण बेलखडे यांनी शिरखेड पोलिस स्टेशनला दिली. त्यावेळी ठाणेदार हेमंत कडूकार, सपोउपनि किशन धुर्वे, छत्रपती करपते हे घटनास्थळी दाखल झाले. प्रज्वलला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले असून, पुढील तपास पोलिस करत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...