आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जनमित्रांच्या योगदानामुळेच दुर्गम भागातही वीज सेवा शक्य‎

अमरावती‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या अचलपूर विभागाने‎ आपल्या ग्राहक सेवेची यशस्वी ५०‎ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अचलपूर‎ विभागाचा सुवर्ण महोत्सव आणि‎ ‘लाईनमन’ दिवस उत्साहात साजरा‎ करण्यात आला. या विभागातील‎ जनमित्रांच्या योगदानामुळे‎ मेळघाटमधील दुर्गम भागातही वीज‎ सेवा शक्य असल्याचे प्रतिपादन‎ कार्यकारी अभियंता संजय शृंगारे‎ यांनी केले आहे.‎ विभागीय कार्यालय अचलपूर येथे‎ शनिवारी (दि. ४) लाईनमन दिन व‎ सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात‎ आले होते. यावेळी विभागाच्या‎ विकासात योगदान देणारे तत्कालीन‎ कार्यकारी अभियंते अजय खोब्रागडे,‎ राजेंद्र गीरी, दिपक अघाव,‎ भारतभूषण औघड यांचीही या‎ कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती‎ होती.‎ याप्रसंगी बोलतांना कार्यकारी‎ अभियंता संजय शृंगारे म्हणाले‎ की,१९७३ साली तत्कालीन वीज‎ मंडळात स्थापन झालेल्या अचलपूर‎ विभागाचा विस्तार हा सहा तालुक्यात‎ आहे.

विभागाने मेळघाट कुशीत‎ घेतल्याने भौगोलीक परिस्थितीनुसार‎ आलेली आव्हाने सर केलीत. मिश्र‎ ग्राहक संख्या, सर्वाधिक वितरण केंद्रे‎ असलेल्या या विभागाने‎ मेळघाट-जरीदा सारख्या दुर्गम भागात‎ सेवा देताना सेवेत खंड पडू दिला‎ नाही, याचे श्रेय या विभागाला योगदान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देणाऱ्या सर्व जनमित्रांना जाते. त्यामुळे‎ विभागाचा सुवर्ण महोत्सव आणि‎ लाईनमन दिन असा दुग्ध शर्करा योग‎ विभागाचा असल्याचे मतही यावेळी‎ त्यांनी व्यक्त केले. काम करतांना‎ सुरक्षेला महत्व देण्याचे आवाहन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यकारी अभियंता भारतभूषण‎ औघड यांनी केले. राजेश तीवारी‎ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त‎ केले.‎ सुवर्णमहोत्सव व लाईनमन‎ दिनानिमित्त जनमित्रांची आरोग्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तपासणी करण्यात आली.

यावेळी‎ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला‎ जनमित्रांचा उत्सफुर्त प्रतिसाद‎ मिळाला. तसेच अचलपूर‎ विभागातील सर्व जनमित्रांचा यावेळी‎ पुष्प देऊन गौरव करण्यात आला.‎ यावेळी जणमित्र राजेश बूराडे,‎ आठवले आणि श्वेता विखार यांनी‎ आपले मनोगत व्यक्त केले. दोन‎ सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंते‎ चेतन मोहोकार आणि विनय लव्हाळे‎ यांनी केले. सुत्रसंचालन अभिजित‎ सदावर्ती, निलेश मानकर व वंदना‎ भलावी यांनी केले, तर आभार‎ उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे,‎ सहाय्यक अभियंता राजेश जरोदे यांनी‎ मानले. या कार्यक्रमाला अतीरिक्त‎ कार्यकारी अभियंता संजय पुरी,‎ उपकार्यकारी अभियंते ज्ञानेश्वर‎ अंबाडकर, सतिश नंदवंशी, देवेंद्र‎ चौधरी, मनोज टवलारकर यांच्यासह‎ विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...