आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांमध्ये जलजीवन मिशन ‎:पाणीपुरवठा योजनेत शुद्धिकरणासाठी‎ आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची व्यवस्था‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जल जीवन मिशन अंतर्गत‎ कार्यान्वित पाणीपुरवठा योजनेत‎ आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची‎ व्यवस्था करण्यात आली असून‎ जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये पाणी शुद्ध‎ करण्यासाठी प्राथमिक स्तरावर ही‎ योजना राबवली जाणार आहे.‎ त्यामुळे येत्या काळात गावांमध्येही‎ शुद्ध पाणी पुरवठा होऊन, जलजन्य‎ आजार कमी होणार आहेत.‎ महानगर, शहरे, गावांमध्ये‎ पाण्याच्या टाक्यांद्वारे पिण्याचे पाणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. हे‎ पाणी आधी धरणे, नहर, नदी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नाल्यांमधून घेतले जाते.

इलेक्ट्रोक्लोरिफिकेशन पाणी शुद्ध‎ करणारी यंत्रणा‎ इलेक्ट्रोक्लोरिनेशन पद्धत‎ आतापर्यंत ग्रामपंचायतींचे कर्मचारी‎ गावोगावी जाऊन पिण्याचे पाणी‎ निर्जंतुक करण्यासाठी त्यात क्लोरिन‎ पावडर टाकायचे. आता हे काम‎ इलेक्ट्रोक्लोरिनेशनद्वारे होणार आहे.‎ या प्रक्रियेत क्लोरिन वायू थेट‎ पाण्यात सोडला जाईल. त्यामुळे‎ मानवी हस्तक्षेप कमी होऊन‎ पाण्याची शुद्धता वाढणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...