आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर पालिका क्षेत्रातील ८४ लाभार्थ्यांना तीन वर्षांपूर्वी घरकुल मंजूर झाले होते, परंतु निधीअभावी लाभार्थ्यांची घराची कामे खोळंबली होती. या लाभार्थ्यांना निधी मिळावा म्हणून आमदार बळवंत वानखडे यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत २ कोटी ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील निधीच्या धनादेशाचे आमदार वानखडे यांच्या हस्ते पालिका कार्यालयात वितरण करण्यात आले. चार वर्षांपासून मंजूर झाल्यावरही निधी अभावी रखडलेल्या लाभार्थ्यांचा धनादेश मिळाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. लाभार्थ्यांनी आमदारांसह प्रशासक सुमेध अलोणे यांचे आभार मानले. या वेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, शहाराध्यक्ष प्रदीप देशमुख, पुरुषोत्तम घोगरे, सुधाकर खारोडे, कैलास सिरसाठ, राजू कुरेशी, सलामुद्दीन, कलिमभाई, रमेश सावळे, विठ्ठल घोंगे, प्रशासकीय अधिकारी रायुफ खान, नगर अभियंता दिनेश थेलकर, आरोग्य अभियंता प्रतिक वाटाणे, अशोक मोरे, रामेश्वर सरकटे, गुणवंत सरकटे, साहेबराव सदाशिव आदी उपस्थित होते.
लाभार्थ्यांनी केले समाधान व्यक्त चार वर्षांपूर्वी घरकुल मंजूर झाल्याने लाभार्थ्यांनी जुने घर पाडून नवीन घरासाठी जागा करत भाड्याच्या घरात रहायला गेले, परंतु निधीअभावी त्यांचे घरकुलाचे स्वप्न अपूर्णच ठरत होते. अनेक वेळा पालिकेत निधीसाठी चकरा मारून लाभार्थी थकले होते. ही बाब मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांनी आमदार बळवंत वानखडे यांना सांगीतली. आमदारांनी ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील इतर नगर परिषदांकडे शिल्लक असलेला निधी अंजनगाव न. प.कडे वळविण्याचे सुचविले. निधीचा धनादेश मिळण्यात झाली आहे. याबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.