आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्ण कामे:‘महावितरण’चे कर्मचारीही म्हणतात, कामे अपूर्णच, मुख्य अभियंत्यांना साकडे

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या मान्सूनपूर्व तयारीचा पुरता बोजवारा उडाल्याचे निरीक्षण खुद्द महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नोंदवले असून, कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे आठवड्यातून एक दिवसाची त्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी ‘एमएसइ वर्कर्स फेडरेशन’ने केली आहे.

‘रस्त्यावरील सताड उघड्या डीबी नागरिकांसाठी अतिधोकादायक!’ या शीर्षकाखाली सोमवार, २० जूनच्या अंकात ‘दिव्य मराठी’ने ‘ग्राऊंड रिपोर्ट’ प्रकाशित केला. त्याची दखल घेत ‘एमएसइ वर्कर्स फेडरेशन’च्या पदाधिकाऱ्यांनी दुपारी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. अमरावती परिमंडळाअंतर्गत ‘प्री मान्सून मेंटेनन्स’ या सदराखाली पावसाळ्याआधी विजवाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल तथा दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र ती कामे केली गेली नाहीत, असे वर्कर्स फेडरेशनच्या निवेदनात नमूद आहे.

फेडरेशनचे झोनल सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनापूर्वी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी लेखी निवेदनासह प्रत्यक्ष चर्चाही झाल्या. चर्चेअंती लेखी आश्वासन सुध्दा संघटनेला मिळाले. परंतू अजूनही त्यावर अंमल झाला नाही, असेही अधीक्षक अभियंत्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. पावसाळा सुरु होऊनही ठरल्याप्रमाणे वीज वाहिनी व प्रणालीची देखभाल दुरुस्ती, त्याचबरोबर ट्री कटिंग इत्यादी कामे झालेली नाहीत. केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवल्या जात आहे. पूर्वी आठवड्यातून एक दिवस (राखीव) म्हणून वीज वाहिन्यांच्या मेंटनन्सकरीता कर्मचाऱ्यांना दिला जात होता, असा स्पष्ट उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.

थोडक्यात वीज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीला दुय्यम स्थान देण्याचे प्रशासनाचे अलिखित धोरण असल्याचा संघटनेचा आरोप असून या उदासिन धोरणाचा परिणाम म्हणून येत्या काळात वादळी वारा, पाऊस व आकाशातील विद्युलतेमुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची शक्यता आहे. या गोंधळात जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांचा रोष वाढत असून त्याचा परिणाम वीज बिल वसुलीवर होत आहे. शिवाय नागरिकांच्या रोषाला कर्मचारी, अधिकारी यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच प्रशासनाने याचा गांभिर्याने विचार करून मान्सूनपूर्व कामे त्वरीत पूर्ण करण्यास प्राधान्यक्रम द्यावा.

बातम्या आणखी आहेत...