आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव बारी येथील बजरंग नगर ही वस्ती नियमानुकूल करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी महिला मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धाव घेतली आहे. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अंजनगाव बारी येथील बजरंग नगर ही वस्ती मागील २००५ पासून वसलेली आहे. या घरांना ग्रामपंचायत अंजनगाव बारी यांनी घर टॅक्स आकारणी केलेली असून या वस्तीत इलेक्ट्रिक विज, नळ योजना अशा शासनाच्या अनेक सुविधा आलेल्या आहेत. बजरंग नगर येथील रहिवासी नागरिकांची नावे समाविष्ट आहेत.
अनेक सुविधा उपलब्ध असून ग्रामपंचायत अंजनगाव घरकुल यादीमध्ये बारी हे हेतुपुरस्सर शासनाच्या घरकुल यादीत नावे असतानाही डावलण्याचे प्रयत्न करीत आहे. या जागेवर घरकुल देण्यास ग्रामपंचायत कार्यालय टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महिला मुक्ती मोर्चाने केला. आहे. बजरंग नगर या वस्तीला नियमानुकूल करणे अत्यंत गरजेचे आहे. २०११च्या शासन निर्णयानुसार नियमानुकूल करण्यात यावे, अशी मागणी महिला मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी अशोक खरात, संगीता वाघ, विनोद गुलदेवकर, रवींद्र इंगळे, किशोर गेडाम, सविता नेवारे, वनिता अजबे, ललिता तायवाडे, पंकज डोनारकर, भीमराव कांबळे, रामचंद्र भोंगरे, शाम वाघमारे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.