आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रम:वलगाव मार्गावरील चांदणी चौक ते पठाण चौक परिसरातील अतिक्रमण काढले

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्षे ठप्प असलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई मनपाने दोन आठवड्यांपासून सुरू केली असून, याअंतर्गतच सोमवारी शहरातील वलगाव मार्गावरील चांदणी चौक ते पठाण चौक मार्गावरील अतिक्रमणे पोलिस संरक्षणात मनपाच्या पथकाने काढली.

शहराच्या विविध भागात अतिक्रमण वाढले असून, ते काढण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा मोठा फौजफाटा कामाला लागला आहे. मर्यादेपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जात असून घरांबाबतही अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळले आहे. बेकायदेशीर बांधकामांची गय केली जाणार नसल्याचे मनपा प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

चांदणी चौकापासून अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पठाण चौक आणि वलगाव मार्गावरील दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणंही काढण्यात आली. या कारवाईत घराच्या संरक्षक भिंती, टिनाचे शेड, अनधिकृत बांधकाम, पानठेले, अनधिकृत दुकाने, दुकानांचे शेड, बॅनर, पोस्टर तसेच मुख्य रस्त्यावरील अतिक्रम.

बातम्या आणखी आहेत...