आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित:समान काम, समान वेतन; कंत्राटी कर्मचारी वंचित

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सध्या आर्थिक शोषण सुरू असून समान काम समान वेतनापासून ते वंचित असल्याचा आरोप मनपा कंत्राटी कर्मचारी, कामगार संघटनेने आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

महापालिकेत सर्व कंत्राटी कर्मचारी व कामगार हे उच्च शिक्षित अगदी कंत्राटी अभियंताही आहेत. त्यामुळे कामगार मनुष्यबळ पुरवण्याच्या कंत्राटी बाह्य संस्थेच्या सर्व निविदा रद्द करण्यात येऊन मनपात कार्यरत कंत्राटी कर्मचारी व कामगारांसाठी अस्थायी आस्थापना स्थापन करून त्याअंतर्गत सामावून घ्यावे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्वांना समान काम, समान वेतन देण्यात यावे. कारण कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

खासगी मनुष्यबळ कंत्राटदार कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही देत नसल्याचा ठपका अमरावती महापालिका कंत्राटी कर्मचारी, कामगार संघाने ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...