आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधींना निवेदन‎:शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी‎ हक्काचा रस्ता निश्चित करून द्या‎ ; शेतकऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

अमरावती‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंदुरजनाघाट‎ वरुड ते रोशनखेडा जुना पाणंद रस्ता‎ रेल्वेनी ताब्यात घेतल्यामुळे वरुड‎ शहरातील शेतकऱ्यांना शेतामध्ये‎ जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही.‎ दरम्यान, रेल्वे स्टेशनच्या बाजूला खूप‎ मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरूम‎ उचलला असून त्याची चौकशी करून‎ शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी‎ मागणी शेतकऱ्यांनी खासदार रामदास‎ तडस, डॉ. अनिल बोंडेंकडे केली.‎ काही शेतकऱ्यांची शेती ही रेल्वे‎ स्टेशनच्या बाजूला आहे. वंश परंपरागत‎ पद्धतीने वरुड शहरातून शेतकरी‎ वरुड-रोशनखेडा या जुन्या पाणंद‎ रस्त्याने शेतामध्ये जात होते, परंतु‎ रेल्वेची निर्मिती झाल्यापासून हा पाणंद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे.‎

सध्याच्या परिस्थितीत शेतकरी रेल्वे‎ रुळाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने जात‎ आहेत, परंतु काही दिवसांपूर्वी या‎ मार्गावर जीवघेणे खड्डे खोदण्यात आले‎ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात‎ जाण्यासाठी रस्ता नसून शेतमाल‎ काढण्यासाठी अडचण निर्माण झाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. रेल्वे प्रशासनाने मोका पाहणी‎ करून सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी‎ तोडगा काढून द्यावा जेणेकरून‎ शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचण‎ होणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी‎ केली आहे. प्रशासनाने याची वेळीच‎ दखल न घेतल्यास सामूहिक‎ आत्महत्येचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...