आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज वाळवंटात झाड लावण्यासारखी नाट्य व कला क्षेत्रातील परिस्थिती झाली आहे. हे कार्य दमदार करण्यासाठी वेगळा विषय घेत महानाट्यातून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरासाठी विविध क्षेत्रातील कलावंतांना रोजगारासह कलेचे दालन उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. साहित्य, नाट्य, संगीत अशी परंपरा असणाऱ्या अचलपूर-परतवाडा शहरात भारवी कला अकादमीची स्थापना करत कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचेअभिनंदन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. भ. महाजन, अशोक बोंडे, डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, राजा धर्माधिकारी, डॉ. एकनाथ तट्टे प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी बच्चू कडु यांनी या अकादमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील परंपरागत कला, वस्तू निर्मिती करून त्यातून रोजगार देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, अशोक बोंडे, रा. भ. महाजन, जितेंद्र रोडे, गजानन मते, राजा धर्माधिकारी, श्रीकांत राजूरकर, कैलास पेंढारकर, संजय ठाकरे, गणेश हिंगणीकर, विठ्ठल गिरी, आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे यांनी केले.
अशी आहे कार्यकारिणी कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी अशोक बोंडे, उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र रोडे, राजा धर्माधिकारी, वासंती राजुरकर, कैलास पेंढारकर (सचिव), सहसचिव- मनोज छापानी व हर्षदा उखळकर, गणेश हिंगणीकर (कोषाध्यक्ष), तर सदस्य म्हणून डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, डॉ. एकनाथ तट्टे, नंदकिशोर पेंडसे, गजानन मते, श्यामसुंदर धुळधर, संजय ठाकरे, सचिन करडे यांची निवड करण्यात आली. याशिवाय साहित्य विभाग, नाट्य विभाग, संगीत विभाग, नृत्य, चित्रकला, सिने व क्रीडा समिती प्रमुखांची देखील या प्रसंगी निवड करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.