आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा संस्था अर्थात इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅन्ड कल्चरल हेरिटेज (इंटक) ही अशासकीय संस्था ऐतिहासिक वारसा स्थळे, वस्तू, नैसर्गिक, सांस्कृतिक व कलेचा वारसा जतन, संवर्धन व यासाठी कार्यरत संस्था आहे. संस्थेची सभा नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे पार पडली. या प्रसंगी अमरावती शाखेची स्थापनादेखील करण्यात आली. सभेसाठी दिल्ली येथील इंटकचे कार्यकारिणी सदस्य तथा अध्याय सल्लागार समितीचे अध्यक्ष जी. एम. कपूर, कार्यकारी सदस्य अशोकसिंग ठाकूर, दिल्लीचे कार्यकारी सदस्य तथा नागपूर अध्याय निमंत्रक डॉ. मधुरा राठोड, सदस्य मनोज जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेचे निमंत्रक डॉ. जयंत वडतकर आणि षार वरणगावकर यांनी सर्वप्रथम सर्व उपस्थितांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय दिला. डाॅ. वडतकर यांनी प्रास्ताविकातून अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा स्थळांचा आढावा सादर केला. अशोकसिंग ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनातून संस्थेबद्दलची माहिती व संस्थेद्वारे जगभरात सुरू असलेले संवर्धन प्रकल्प याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. जी. एम. कपूर यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनची माहिती देत सदस्यांच्या सहकार्याने आजवर केलेल्या यशस्वी कामाची माहिती देऊन इंटकचे सदस्य हे स्वतः स्वयंसेवक म्हणून कार्य करीत असल्यानेच संस्थेने यश संपादन केल्याची भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
डॉ. मधुरा राठोड यांनी देशभरात १९० अध्यायांच्या माध्यमातून होत असलेले कार्य व अध्यायाची कार्यप्रणाली तसेच नवीन अध्याय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया याबाबत माहिती देऊन अमरावती अध्याय सुरू करण्यासाठी अमरावतीकरांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थितांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत शिंगवेकर यांनी केले. डॉ. जयंत वडतकर आणि श्री तुषार वरणगावकर यांचेसह किरण मोरे, प्रा. डॉ. विनोद भटकर, प्रा. डॉ. नेहा भटकर, प्रा. डॉ. प्रशांत शिंगवेकर, प्रा. डॉ. अभिजित मेंढे, सतेज केचे, जयंत सोनोने, पंकज बांडाबुचे, प्रदीप पाटील, अंकुश खंडारे, स्नेहल विधळे, तृप्ती भामकर, नीलेश कंचनपुरे, जगदीश गुप्ता, मल्हार पुंडलिक आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.