आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:जिल्ह्यात 15  दिवसांनंतरही कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या शून्याने अमरावतीत पंधराहून अधिक दिवसांचा कालखंड पूर्ण केला आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अमरावतीतील हे चित्र नागरिकांसाठी दिलासादायक मानले जात आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोणताही नवा रुग्ण आढळून आला नाही.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ७ हजार १२५ जणांना कोरोनाने ग्रासले असून त्यापैकी १ लाख ५ हजार ४९७ नागरिकांनी त्यापासून सहिसलामत सुटका करुन घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या आजाराने १ हजार ५९६ व्यक्तींचा मृत्यू ओढवला असून, इतर जिल्ह्यातील ३२ जणांनीही उपचारादरम्यान अमरावतीत प्राण सोडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...