आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीत शेडची मागणी करूनही दखल नाही:शेतकऱ्यांनी यार्डमध्येच दिला ठिय्या; तीव्र आंदोलनाचा इशारा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजार समितीमध्ये ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देताना शेतकरी. - Divya Marathi
बाजार समितीमध्ये ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देताना शेतकरी.

वारंवार शेड उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करूनदेखील त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. त्या अनुषंगाने गुरूवारी (ता. 6) शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डवर ठिय्या आंदोलन केले. या वेळी दोन दिवसांत व्यापाऱ्यांचा माल असलेले शेड मोकळे न केल्यास तिव्र आंदोलनाचा इशाराही बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे.

अनेक शासकीय योजनांमधून खास शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीतील मोठमोठ्या शेडमध्ये व्यापाऱ्याचा माल गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे ठेवल्या जातो, तर बळीराजाचा शेतमाल मात्र उघड्यावर टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये घडत आहे.

सर्वात जास्त आवक असणारी बाजारपेठ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या येथील बाजार समितीत शेतकऱ्यांची वाढती आवक पाहता विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता मोठे शेड बांधण्यात आलेत. मात्र त्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच शेतमाल गेल्या अनेक वर्षांपासून ठेवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा आलेला माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने मात्र, शेतकऱ्यांना उघड्यावर शेत माला टाकावा लागतो.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा माल ओला होतो आणि व्यापारी तो माल कमी भावाने मागतात. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावते, तर शेतकऱ्याच्या हातात केवळ निराशाच येते. या संपूर्ण प्रकाराविरुध्द शेतकऱ्यांनी गुरूवारी बाजार समिती यार्डवर एल्गार पुकारत व्यापाऱ्यांचा माल तत्काळ रिकामा करून शेड शेतकऱ्यांसाठी मोकळे करावे या मागणीसाठी अमरावती जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

व्यापाऱ्यांनी त्वरित शेड रिकामे करावे, अशी मागणी बाजार समितीचे प्रशासक भालचंद्र पारीसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दोन दिवसात शेड रिकामे न केल्यास तीव्र आदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

शेड रिकामे करण्यासंबंधी आदेश

''शेतकऱ्यांच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल असल्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून या संदर्भात व्यापाऱ्यांचा माल काढून शेड रिकामे करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. दोन ते तीन दिवसात शेड रिकामे करण्याचा प्रयत्न आहे.'' -भालचंद पारिसे, प्रशासक, 'कृउबास'

​​​​

बातम्या आणखी आहेत...