आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार असूनही, आपल्या मालकीच्या वाहनावर विधानसभा सदस्य लिहिलेले आणि राजमुद्रा असलेले स्टिकर लावून वर्धा जिल्ह्यात तेलंगणा पार्टीचा झेंडा घेऊन फेरफटका मारताना दिसत आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पक्षात आर्णी-केळापूर मतदारसंघातील माजी आमदार राजू तोडसाम यांनी प्रवेश घेतला. पक्षाने त्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये प्रचार व प्रसा करण्यासाठी 24 मेपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार राजू तोडसाम त्यांच्या मालकीच्या महागड्या चारचाकी वाहनाने आले.
विशेष म्हणजे त्यांच्या वाहनाच्या समोरील काचेवर चक्क विधानसभा सदस्य व राजमुद्रा असलेले स्टिकर दिसून आले. वास्तविक असे स्टिकर फक्त विद्यमान आमदारांना लावण्याचे अधिकार आहेत, तरीसुध्दा माजी आमदार राजू तोडसाम हे वाहनावर स्टीकर लावून सर्रास फिरत आहेत.
याबाबत तोडसाम यांना विचारले असता, माझ्या मेव्हण्याचे वाहन असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आरटीओ कार्यालयातील अभिलेखावर पाहणी केली असता, एमएच 29 एटी 0750 या क्रमांकाचे वाहन त्यांच्या स्वत:च्या नावाने दिसून आले. सोबतच वाहनावर चारअंकी नंबर लिहिणे आवश्यक असताना त्यांनी तीन अंकामध्ये नंबर लिहून आरटीओ विभागाच्या नियमांचे सुद्धा उल्लंघन केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.