आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

82 वर्षीय तक्रारदाराला केली होती बेदम मारहाण‎:खूनप्रकरणात देवमाळीच्या‎ माजी सरपंच पतीला जन्मठेप‎

अमरावती‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडालगत असलेल्या देवमाळी‎ ग्रामपंचायत परिसरात एका ८२ वर्षीय‎ तक्रारदाराला तत्कालीन सरपंच पती व‎ सरपंचाकडून सहा वर्षांपूर्वी बेदम‎ मारहाण करण्यात आली होती. या‎ मारहाणीत त्या वृध्दाचा मृत्यू झाला‎ होता. या खूनप्रकरणात अचलपूर‎ येथील जिल्हा न्यायाधीश (क्रमांक २)‎ एस. एन. यादव यांच्या न्यायालयात‎ माजी सरपंच पतीविरुद्ध दोष सिद्ध‎ झाल्यामुळे न्यायालयाने सरपंच पतीला‎ जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याचवेळी‎ देवमाळीच्या तत्कालीन सरपंच‎ महिलेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष‎ मुक्तता करण्यात आली आहे. हा‎ निर्णय न्यायालयाने शुक्रवारी (दि. १०)‎ दिला आहे.‎ विधी सूत्रानुसार, भास्कर‎ विठ्ठलराव चौधरी (६६, रा. देवमाळी,‎ परतवाडा) असे जन्मठेपेची शिक्षा‎ झालेल्या माजी सरपंच पतीचे नाव‎ आहे. याचवेळी माजी सरपंच विद्या‎ भास्कर चौधरी यांची निर्दोष मुक्तता‎ करण्यात आली. गणेशराव हरिश्चंद्र‎ चौधरी (८२, रा. देवमाळी,‎ परतवाडा) असे मृतकाचे नाव आहे.‎

गणेशराव चौधरी यांनी आरोपींच्या‎ भ्रष्ट्राचाराविरोधात असंख्य तक्रारी‎ केल्या होत्या, तर आरोपींनी देखील‎ गणेश चौधरी यांच्या मंगल‎ कार्यालयाबाबत तक्रार केली होती.‎ याच कारणातून ३० जून २०१७ रोजी‎ दुपारी गणेश चौधरी हे देवमाळी‎ ग्रामपंचायत सचिव ढेरे यांच्याकडे‎ माहितीच्या अधिकाराखाली माहिती‎ घेण्यासाठी गेले असता, ते पाहून‎ भास्कर चौधरी यांनी वाद घातला.‎ भांडण इतके वाढले की भास्कर‎ आणि त्याची पत्नी विद्या यांनी‎ गणेशराव चौधरी यांना मारामारी‎ केली. ज्यामध्ये गणेश यांचा मृत्यू‎ झाला. याप्रकरणी गणेशराव चौधरी‎ यांचा मुलगा प्रवीण यांनी परतवाडा‎ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरुन‎ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल‎ केला. या खटल्यात सहायक सरकारी‎ वकील अॅड.सुनील देशमुख यांनी १२‎ साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या.‎ ज्यामध्ये भास्कर विठ्ठलराव चौधरी‎ याच्याविरुध्द दोष सिध्द झाला व‎ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा‎ सुनावली. सहायक सरकारी वकील‎ सुनील देशमुख यांनी यशस्वी‎ युक्तिवाद केला.‎

बातम्या आणखी आहेत...