आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन‎:सारडा महाविद्यालयामध्ये‎ औषधी वनस्पतींचे प्रदर्शन‎

अंजनगाव सुर्जी‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औषधी गुणधर्म असलेल्या‎ विविध प्रकारच्या वनस्पती‎ काळाच्या ओघात टिकवून‎ ठेवण्यासाठी त्यांची योग्य‎ पद्धतीने लागवड होणे‎ आवश्यक असल्याचे प्रतिपादन‎ नवी दिल्ली येथील क्वालिटी‎ कौन्सिल ऑफ इंडियाचे डॉ.‎ राजीव शर्मा यांनी केले.‎ स्थानिक श्रीमती राधाबाई‎ सारडा कला वाणिज्य व‎ विज्ञान महाविद्यालयातील‎ वनस्पतिशास्त्र विभागाच्या‎ वतीने राष्ट्रीय विज्ञान‎ दिवसाच्या निमित्ताने वारसा‎ एथनिक नॉलेज हेरिटेज‎ सोसायटी व कार्ड संस्थेच्या‎ संयुक्त सहकार्याने औषधी‎ वनस्पतींच्या प्रदर्शनाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎

त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते‎ बोलत होते.‎ प्रदर्शनाचे उद््घाटन डॉ. अमर‎ सारडा, जगदीश सारडा, डॉ.‎ मधुसूदन सारडा, संजय‎ सारडा, डॉ. राजीव शर्मा,‎ विजयकुमार लाडोळे यांनी‎ केले. या प्रसंगी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.‎ वशिष्ठ चौबे यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले. वनस्पतिशास्त्र‎ विभाग प्रमुख डॉ. मंगेश‎ डगवाल यांनी उद्यानामध्ये‎ असलेल्या औषधी वनस्पतींची‎ माहिती दिली. ५० विद्यार्थ्यांनी‎ औषधी वनस्पतींचे सादर केले.‎

बातम्या आणखी आहेत...